Suraj Chavan : 'बिग बॉस फेम' सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' सिनेमा 'या' दिवशी होणार रिलीज!

    02-Feb-2025
Total Views |


SURAJ CHAVAN

मुंबई : बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाण नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. गरीबीतून वर आलेल्या सुरजने आपल्या अनोख्या झापुक झुपूक स्टाईलने सगळ्यांची मनं जिंकली. बिग बॉस मराठी ५ च्या पर्वाने चांगलाचं धुव्वा केला होता. या पर्वात सोशल मिडीया स्टार सुरजने आपल्या साधेपणाच्या जोरावर सर्व रसिकांची मनं जिंकून विजेतापदावर नाव कोरले. कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक घोषणा केली होती. सूरजला घेऊन एक मराठी सिनेमाची निर्मिती करणार असं त्यांनी जाहीर केलं होतं. या सिनेमाचं पोस्टर शेअर करत हा चित्रपट २५ एप्रिल पासून जवळच्या चित्रपटात प्रदर्शित केला जाईल असे जाहीर करण्यात आले आहे.
इतकंच नाही तर त्या सिनेमाचं नाव 'झापुक झुपूक' असेल असंही केदार शिंदे म्हणाले होते. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. माघी गणेश जयंतीला या चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. पोस्टरमध्ये सूरजचा वेगळाच लूक बघायला मिळतोय. हार्ट शेपची प्रिंट असलेला व्हाईट कुर्ता आणि पायजमा त्यावर लाल रंगाचं जॅकेट असा पेहराव सूरजने केला आहे. त्याने गॉगल घातल्याचंही पोस्टरमध्ये दिसत आहे. त्याच्या गळ्यात सोन्याची साकळी आणि हातात सोन्याचं घड्याळ आहे. तो डॉल्बी स्पीकरवर डॅशिंग अंदाजात बसलेला दिसतोय.
'करूया श्रीगणेशा…माघी गणपतीच्या मुहूर्तावर... बाप्पाच्या आशीर्वादाने येतोय…तुमच्यातलाच माणूस तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, २५ एप्रिल पासून, ‘झापुक झुपूक’ अशी कॅप्शन देत सिनेमाची रिलीज डेट जियोस्टूडीओने इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केली. राजश्री मराठी आणि केदार शिंदेंच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही हे पोस्टर शेअर करण्यात आलं आहे.
हे मोशन पोस्टर पाहून एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की,'झापुक झुपुक हाउसफुल होणार बुक्कीत टेंगूळ देणार'. अन्य एकाने लिहिलं की, 'आलास का भावा मस्तच'. दरम्यान काही नेटकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. 'मराठी चित्रपटसृष्टीची शोकांतिका!!', 'आधीच मराठी सिनेमा कोण बघत नाही आता हा हिरो कमाल', 'हेच बाकी होत आता.... काय हे...', अशाही प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
'झापुक झुपूक' सिनेमात हे कलाकार जळकणार :
झापुक झुपूक या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. चित्रपटाचे निर्माते बेला केदार शिंदे आणि ज्योति देशपांडे आहेत. या चित्रपटात सुरज चव्हाण सोबत मिलिंद गवळी, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, जुई भागवत हे कलाकार दिसणार आहेत. सुरजने चित्रपटातील सर्व कलाकरांना त्याच्या सोशल मिडियावर टॅग करून त्यांचे आभार व्यक्त केले.