सुप्रसिद्ध लावणीकिंग आशिष पाटील याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल!

    02-Feb-2025
Total Views |



asish patil


मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या नृत्य कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लावणीकिंग आशिष पाटील याच्यावर फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण कलमे यांनी आशिष पाटील याच्यावर सांस्कृतिक शोचे नाव आणि संकल्पनेची चोरी करून तो स्वतःचा शो म्हणून बनविल्याचा आरोप केला आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, प्रवीण कलमे यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये 'वर्ल्ड ऑफ स्ट्री' या बहुचर्चित डान्स शोचे आयोजन अमृतकला स्टुडिओच्या सहकार्याने केले होते. या शोचे नृत्यदिग्दर्शन व दिग्दर्शन आशिषने केले. या दरम्यान प्रवीण कलमे यांनी लावणी व इतर नृत्यप्रकार एकत्र करून ‘सुंदरी’नावाच्या लावणी या फ्युजन सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना आशिषच्या समोर मांडली होती.
२९ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रवीण कलमे यांनी ‘सुंदरी’ नावाचा ट्रेडमार्क मनोरंजन सेवांच्या नोंदणीसाठी अर्ज करून आवश्यक शुल्क भरले होते. मात्र, जानेवारी २०२५ मध्ये त्यांना धक्का बसला, जेव्हा आशिष पाटील ‘सुंदरी: लावणीचा इतिहास’ या नावाने सांस्कृतिक कार्यक्रम ६ फेब्रुवारी २०२५ रोजी नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात आयोजित करणार असल्याचे समजले.
प्रवीण कलमे यांचा दावा आहे. की ‘सुंदरी’या नावाचा ट्रेडमार्क आणि संकल्पना त्यांची असून आशिषने ती चोरून स्वतःच्या नावावर बनवून घे तले. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी सादर करीत आहे आणि सदर कार्यक्रम ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन करते. परिणामी, याबाबत प्रवीण कलमे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत वाणिज्यिक बौद्धिक संपदा (कमरशिअल आयपी सूट) न्यायालयीन केस दाखल केली आहे, तसेच अंतिम निर्णयापूर्वी पुढील नुकसान टाळण्यासाठी तात्कालिक मदतीसाठी अर्ज केला आहे.