सचिनला देशांतर्गत क्रिकेटमध्ये संधी देणारे माजी क्रिकेटपटू मिलिंद रेगे कालवश!

19 Feb 2025 11:46:17
former cricketer milind rege passed away

 
मुंबई :        मुंबई रणजी संघाचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७६व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. एका अहवालानुसार, रेगे यांच्या किडनी निकामी झाली होती. रेगेंच्या निधनाने देशांतर्गत क्रिकेटचे मोठे नुकसान झाले आहे. मिलिंद रेगे यांनी मुंबई रणजी संघाचे नेतृत्व केले. माजी क्रिकेटर मिलिंद रेगे यांनी मुंबई क्रिकेट संघटनेत निवड समिती सदस्यसह मार्गदर्शकाचीदेखील भूमिका उत्तमरित्या बजावली.

दरम्यान, १९६७-६८ ते १९७७-७८ या कालावधीत मिलिंद रेगे मुंबई क्रिकेट संघातून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. नंतरच्या काळात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे अध्यक्षदेखील मिलिंद रेगे राहिले होते. याच काळात रेगेंनी १९८८-८९ च्या हंगामात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मोठी संधी मिळवून दिली. दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे खास मित्र राहिलेले मित्र रेगे एकत्र मुंबईसाठी खेळले आहेत.

मिलिंद रेगे यांच्याबद्दल असेही बोलले जाते की, त्यांना क्रिकेटची खूप आवड होती. पण वयाच्या २६ व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्यांना क्रिकेट सोडावे लागले होते. तरीदेखील क्रिकेटशी जुळलेली नाळ कधीच तुटली नाही. तब्बल तीन दशके मुंबई क्रिकेट संघटनेचं निवडकर्ता म्हणून कामगिरी बजावली. विशेष म्हणजे आयुष्याच्या अखेरपर्यंत ते क्रिकेट सल्लागार म्हणून असोसिएशनसोबत कार्यरत होते.


Powered By Sangraha 9.0