डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरेंची धडपड! दर आठवड्यात पक्षाची बैठक घेणार

19 Feb 2025 13:21:02
 
Thackeray
 
मुंबई : राज्यभरात उबाठा गटाला लागलेली गळती रोखण्याकरिता उद्धव ठाकेरे आता ॲक्शन मोडवर आले आहेत. यासाठी दर आठवड्याला पक्षातील नेत्यांची बैठक घेण्यात येणार असून यात उद्धव ठाकरे संघटनेचा आढावा घेणार आहेत.
 
गेल्या काही दिवसांत उबाठा गटात गळतीसत्र सुरु आहे. राज्यातील विविध भागांतून ठाकरेंचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांना सोडचिठ्ठी देत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता उद्धव ठाकरे सध्या अलर्ट झाले आहेत. दर मंगळवारी शिवसेना भवनात पक्षाची आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. तसेच पक्षाचे नेते राज्यभरात दौरे करणार आहेत.
 
हे वाचलंत का? -  बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा! अमरावतीत ६ जणांविरूद्ध एफआयआर दाखल
 
उबाठा गटातील अनेक महत्वाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही उद्धव ठाकरेंना रामराम ठोकत महायूती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलाय. कोकणात तर उबाठा गट पार संपल्यात जमा आहे. त्यामुळे पक्षला लागलेली ही गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सध्या धडपड सुरु केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0