श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या सोपोरेमध्ये न्यायालयाने मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या पीर बाबाला १४ वर्षांची सक्तमजुरी आणि १ लाख रुपये दंड ठोठावत शिक्षा केली. ५४ वर्षीय पीर बाबा यांचे खरे नाव हे एजाज अहमद शेख आहे. २०१७ मध्ये त्याच्यावर आरोप दाखल करण्यात आले. या प्रकरणामध्ये न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी दोषी असल्याचे घोषित करण्यात आले होते.
एजाज अहमद यांने लैंगिक शोषण करण्यात आलेल्या अनेक मुलांपैकी एकाने तिच्या वडिलांना त्याच्या अशा क्रूर कृत्याबाबत सांगितले होते की, एजाज अहमद धार्मिक शिक्षण देण्याच्या नावाखाली सतत लैंगिक शोषण करत होता. यासाठी कोणीही नकार दिल्यास एजाज अहमद त्याला धमकी देत असायचा. त्याने मुलांना जिन्न भेटवण्याचे कारण सांगून फसवणूक करून वासनेचे बळी बनवले होते.
एका पीडितेने वर्षभरामध्ये ५०० हून अधिक जास्त लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. त्यावेळी, दुसऱ्या एका पीडितेने सांगितले की, एजाजने मुलांना एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले गेले. यानंतर याबाबत कोणाला सांगितले तर मारण्याची धमकी देत होता. त्याने अशा अनेक मुलांना बळी बनवले आहे.