राज्यात लवकरच नव्या परिवहन व्यवस्था

19 Feb 2025 12:25:13

rope way


मुंबई, दि.१९: प्रतिनिधी 
मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वाढत्या प्रवासी संख्येमुळे सध्या असलेल्या परिवहन सेवेच्या विस्तारासह आगामी पाच परिवहन विभागांतर्गत ‘रोप वे’ या नवीन परिवहन सेवेचा अंतर्भाव करण्याच्यादृष्टीने राज्यातील रोपवेची कामे कार्यान्वित करण्यास बुधवार, दि.१८ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या बैठकीत राज्य शासनामार्फत १६ आणि राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि.(एनएचएलएमएल)मार्फत २९ अशी एकूण ४५ रोपवेची कामे हाती घेण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली. ही रोपवेची कामे करण्याकरिता एनएचएलएमएल या यंत्रणेला ला आवश्यक जागा ३० वर्षाच्या भाडेपट्टीवर उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेअंतर्गत काही प्रकल्पांस राज्य शासनाने एनएचएलएमएलला समभाग हिस्सा उपलब्ध करून दिल्यास या प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नात राज्य शासनाचा हिस्सा राहील, अशा या महसूली प्रारूपासही मान्यता देण्यात आली. यातील प्रकल्पनिहाय स्वतंत्र करार केला जाणार आहे. त्यापूर्वी या प्रत्येक प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीपुढे सादर करण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0