मुंबई : यूट्यूबर आणि पॉडकास्ट स्टार रणवीर अलाहबादीयाला कोर्टाने कठोर सुनावणी केली आहे. इंडियाज गॉट लेटेंट शो मध्ये अश्लील टिपण्णी केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या. रणवीर अलाहबादीयाने या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. रणवीर अलाहाबादियाचे हे प्रकरण लवकरच सुनावणीसाठी घेतले जाणार, असे भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी १४ फेब्रुवारी रोजी म्हटले होते.
इंडियाज गॉट लेटेंट या शो मध्ये एका स्पर्धकाला अश्लील प्रश्न विचारल्याने रणवीरला १८ फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टाने चांगलाच फटकार लावला. या प्रकरणामुळे रणवीर अलाहबादीयाला कोणतेच शोज करता येणार नाही आहेत. रणवीर ला अटकेपासून स्वातंत्र्य जरी दिले असले तरी त्याचे पासपोर्ट पोलिसांजवळ जमा करण्याचा आदेश कोर्टाने दिला.
सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला त्याच्या अश्लील टिप्पणीबद्दल चांगलाच फटकारलं आहे. “रणवीरच्या मनात काहीतरी खूप घाणेरडं होतं, ते त्याने त्या शोमध्ये ओकलं. अशा वर्तनाचा निषेध करायला हवा. तुम्ही लोकप्रिय आहात म्हणून तुम्ही समाजाला गृहीत धरू शकत नाही. समाजात अशी कोणती व्यक्ती आहे का, ज्याला ही भाषा आवडेल? अशी टिप्पणी करणाऱ्याला आम्ही का संरक्षण द्यावं”, असं न्यायालयाने सुनावलं.