मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडली असून यात विविध महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय?
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटींची मान्यता देण्यात आली आहे. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात १ लाख ८ हजार १९७ हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार आहे. यासोबतच अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) ३४६ नवीन पद आणि त्यासाठीच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
हे वाचलंत का? - राजीनाम्यानंतर जितेंद्र जनावळे मातोश्रीवर दाखल! म्हणाले, "विलेपार्ल्यात निर्णय घेणारे राऊत आणि अनिल परब कोण?"
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच राज्यातील रोपवेच्या कामांसाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (NHLML) ला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच जळगांव जिल्ह्यातील चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता मिळाली असून चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८ हजार २९० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा देण्यात येणार आहे. तसेच पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.