मुंबई : नवी दिल्ली येथे पार पडणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर, समांतर पण वेगळे असे विद्रोही साहित्य संमेलन या वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक २१ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या तीन दिवसात पार पडणार आहे. दिनांक १५ फेब्रुवारी रोजी विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन झाले. या बोधचिन्हाचे प्रकाशन मुस्तजीब खान यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हं चित्रकार राजानंद सुरडकर यांनी रेखटले आहे. यात हातामध्ये लेखणीची मशाल असल्याचे दिसून येते. त्याच बरोबर छत्रपती संभाजीनगर इथला बिबी का मकबारा या सांस्कृतिक वैशिष्ठ्याचे सुद्धा समावेश या बोधचिन्हात करण्यात आला आहे. या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. अशोक राणा भूषवणार आहे.