मुंबईत शिवसेनेच्यावतीने महाआरोग्य शिबीर

    17-Feb-2025
Total Views |

Maha Arogya Shibir
 
मुंबई : (Maha Arogya Shibir) हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे अध्यक्ष तथा शिवसेना सचिव सिद्धेश रामदास कदम यांनी मुंबई येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या महाआरोग्य शिबिरामध्ये मोफत तपासण्यांसोबतच औषधोपचार तसेच, रुग्णांना व्हील चेअर्स, वॉकर्स, चष्मे आणि इतर वैद्यकीय सामग्रीदेखील मोफत वाटण्यात आली. विशेष म्हणजे या शिबिरात तब्बल दहा हजारांहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला असून, लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद या महाआरोग्य शिबिराला लाभला आहे.
 
या महाआरोग्य शिबिराला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम, शिवसेनेचे तरुण नेतृत्व खा. डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थिती दर्शवून या शिबिराच्या आयोजनाबाबत सिद्धेश कदम यांची पाठ थोपटून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे, खा. रविंद्र वायकर, संजय मोरे, शीतल म्हात्रे, प्रकाश सुर्वे, मनिषा कायंदे, मीना कांबळे, किरण पावसकर, दीपक सावंत, संजय मोरे, भाऊसाहेब चौधरी हेदेखील उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती दर्शविल्याबद्दल सिद्धेश कदम यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.