दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' दिवशी होणार सोहळा

17 Feb 2025 12:54:02

DELHI CM
 
नवी दिल्ली : (Delhi) राजधानी दिल्लीत दि. १७ फेब्रुवारी रोजी होणारी भाजप आमदारांची बैठक रद्द झाली आहे. त्यामुळे आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची निर्णय लांबणीवर जाणार आहे. येत्या २० फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री पदाच्या निवडीसंदर्भात भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक होण्याची शक्यता आहे. भाजपने यंदाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ४८ जागांसह निर्णायक विजय मिळवला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्‍ली विधानसभा निवडणूकीच्या निकालास दहा दिवसांपेक्षा अधिक काळ लोटल्‍यानंतरही नवीन मुख्यमंत्रीपदाचा अनिश्तिता कायम आहे. नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी भाजप आमदारांची आज बैठक होणार होती. मात्र आता ही बैठक आता पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक १९ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ १८ फेब्रुवारीऐवजी २० फेब्रुवारी रोजी होणार असल्याच्या चर्चा आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0