सहकार भारती आयोजित श्री सतीश मराठे 'अमृत महोत्सवी सोहळा'

    17-Feb-2025
Total Views |

Satish Marathe

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Satish Marathe)
सहकार भारती संस्थापक मंडळाचे सदस्य आणि भारतीय रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांचा 'अमृत महोत्सवी सोहळा' बुधवार, दि. १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११ ते १ या वेळेत श्री स्वामी नारायण मंदिर सभागृह, दादर रेल्वे स्थानक, दादर पूर्व याठिकाणी सदर कार्यक्रम संपन्न होईल. यादरम्यान प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी उपस्थित असतील. तर विशेष अतिथी म्हणून इफको, दिल्लीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उदय शंकर अवस्थी व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची उपस्थिती असेल.