महाकुंभात असं काय घडलं? ज्याची नोंद एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सना घ्यावी लागली

17 Feb 2025 16:31:42

Record in Mahakumbh

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (National Record in Mahakumbh)
प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभात दिव्य ज्योती जागृति संस्थान शिबिरात ५०४ ब्रह्मज्ञानी विद्वानांनी वेदमंत्रांचा अखंड जप करून विश्वविक्रम केल्याची नोंद नुकतीच झाली. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स टीमच्या अधिकाऱ्यांनी त्याचे प्रमाणपत्र जागृती संस्थेला दिले. दि. १४ जानेवारी पासून या संस्थानच्या शिबिरात सुरु असेलल्या वेदमंत्रांच्या अखंड पठणाचे लाखो लोक साक्षिदार होते. ही भव्य अध्यात्मिक परंपरा पाहून अनेक जण यावेळी भारावून गेले. ही विलक्षण तपश्चर्या ३३ दिवस चालू होती.

हे वाचलंत का? : "हिंदुराष्ट्र झाल्यास..."; महंत चेतनगिरी महाराजांचे भाकित खरे ठरणार?

सेक्टर-९ येथील प्रकल्प शिबिरात ५०४ ब्रह्मज्ञानी वैदिक विद्वानांनी एकूण २५,६१,३२८ वैदिक मंत्रांचा जप केल्याची माहिती आहे. ज्यामध्ये शुक्ल यजुर्वेदी रुद्र अष्टाध्यायी ग्रंथाच्या ११,१५१ प्रतिपादनांचा समावेश आहे. दि. १४ जानेवारी पासून सुरु झालेल्या या विलक्षण कार्याची सांगता दि.१६ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता झाली. ज्याची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अधिकृतपणे झाली आहे.

Powered By Sangraha 9.0