नवी दिल्ली रेल्वेस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी लालू प्रसाद यांचे महाकुंभावर आक्षेपार्ह विधान

16 Feb 2025 16:26:03
 
Mahakumbh 2025
 
पटना (Mahakumbh 2025) : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातावर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी कुंभमेळ्याबाबत गरळ ओकली आहे. महाकुंभमेळ्यावर त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यांनी या अपघातासाठी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरले आहे. याप्रकरणी रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी घेण्याची मागणी केली आहे.
 
 
महाकुंभाबाबत बोलत असताना ते म्हणाले की, महाकुंभाला कोणताही एक अर्थ नाही. त्याचा कोणताही एक उपयोग नसल्याचे बेताल वक्तव्य लालू प्रसाद यादव यांनी केलं आहे. २००४ साली झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये लालू यादवही जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण तत्कालीन लालू प्रसाद यादव हे रेल्वेमंत्री होते. तेव्हा छठपूजा निमित्त रेल्वेस्थानकावर चेंगराचेंगरी झाली होती.
 
दरम्यान, दिल्ली रेल्वेस्थानकावर झालेल्या अपघातामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला होता. तर त्यामध्ये काहीजण जखमी असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अशातच मृत व्यक्तीस १० लाखांची प्रशासन मदत करणार असल्याचे प्रसारमाध्यमांनी माहिती दिली आहे.  ही घटना शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली होती. 
Powered By Sangraha 9.0