रणवीर अलाहाबादियानंतर कॉमेडियन कलाकाराचा कार्यक्रम रद्द

16 Feb 2025 21:02:21
 
Ranveer Alabadia
 
लखनऊ : उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या उपाध्यक्षा अपर्णा यादव यांनी केलेल्या तक्रारीनंतर विनोदी कलाकार अनुभव सिंह बस्सी यांचा लखनऊमधील कार्यक्रम रद्द करण्यात आला. अधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीमुळे हा कार्यक्रम रद्द केला, असे सांगण्यात येत आहे. बस्सीच्या शोमध्ये अनुचित बाब दाखवली जाऊ शकते या भीतीने महिला आयोगाने डीजीपींना सांगितले होते की यामध्ये कोणतीही आक्षेपार्ह विधान करू नये.
 
 
 
दरम्यान, काही दिवसांआधी रणवीर अलाहाबादियाने पालकांशी लैंगिक संबंधाबाबत विधान केले होते. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. ३२ वर्षीय अनुराग बस्सीने लखनऊमधील राम मनोहर लोहिया राष्ट्रीय कायदा विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. २०१७ मध्ये अनुरागच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि तेव्हापासून त्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद देण्यात आला.
 
 
Powered By Sangraha 9.0