दिल्ली मेट्रो स्थानकावर महाकुंभाला जाणाऱ्या १९ प्रवाशांचा मृत्यू

16 Feb 2025 15:37:59
 
Mahakumbh 2025
 
नवी दिल्ली (Mahakumbh 2025) : नवी दिल्लीच्या मेट्रो स्थानकाजवळ शनिवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने चेंगराचेंगरीमध्ये १९ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर शेकडो प्रवासी जखमी झाले आहेत. दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची पुष्टी केली आहे.
 
याप्रकरणी रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू शेखर उपाध्याय यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, पाटणाकडे जाणारी मगध एक्सप्रेस नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर उभी असताना आणि जम्मूकडे जाणारी उत्तर संपर्क क्रांती प्लॅटफॉर्म क्रमांक १५ वर उभी असताना ही घटना घडली आहे.
 
 
 
या दुर्देवी घटनेनंतर आता भारतीय रेल्वेने पीडितांना भरपाई जाहीर केली. मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्यांना एक लाख रुपये भरपाई मिळेल.
 
या घटनेनंतर भारतीय रेल्वेने पीडितांना भरपाई जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची भरपाई दिली जाईल. गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपये भरपाई मिळेल. दरम्यान नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर यापूर्वी २००४,२०१० आणि २०१२ मध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवाले लागले होते.
 
Powered By Sangraha 9.0