सर्वोच्च न्यायालयाचा रणवीर अलाहाबादियाला झटका!

15 Feb 2025 13:52:20



RANVEER ALLAHBADIYA



मुंबई : इंडीयाज गॉट लेटेंट शोमध्ये अश्लील टिपण्णी केल्यामुळे रणवीर अलाहाबादिया अडचणीत सापडला आहे. रणवीरने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र, दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
युट्युबर रणवीर अलाहबादिया, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अपूर्व मखीजा, समय रैना आणि इंडीयाज गॉट लेटेंट च्या आयोजकांविरूध्द इंडीयाज गॉट लेटेंट मधील अश्लील टिपण्णी मुळे तक्रार दाखल करण्यात आली आहे. रणवीर अलाहबादिया देशातील अनेक शहरांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान रणवीरचे वकील अभिनव चंद्रचुड यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्या. संजय कुमार यांच्या खंडपीठाने ही मागणी फेटाळली. सरन्यायाधीश खन्ना म्हणाले की,"मौखिक स्वरुपात तातडीने सुणावणी करण्याच्या मागणीवर विचार केला जाणार नाही. आधी तुम्ही रजीस्टरकडे जा" येत्या दोन तीन दिवसांत सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. रणवीर अलाहबादियाला शुक्रवारी आसाम पोलिसांनी बोलावले होते, या आधारावर अभिनय चंद्रचुड यांनी तातडीनी सुनावणीची मागणी केली.



Powered By Sangraha 9.0