ह्रदयद्रावक! महाकुंभला जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात

15 Feb 2025 20:17:22

Mahakumbh 2025
 
लखनऊ : उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज जिल्ह्यात महाकुंभ (Mahakumbh 2025) सोहळा सुरू आहे. या सोहळ्याला परदेशातून भाविक येत आहेत. अशातच या सोहळ्याला जाणाऱ्या भाविकांचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये १० भाविकांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावर झाला. 
 
भाविकांना घेऊन जाणाऱ्या बोलेरोची आणि प्रयागराज महाकुंभासाठी आलेल्या भाविकांच्या बसदरम्यान टक्कर झाली. या भीषण अपघातात बोलेरो गाडीचा चेंदामेंदा झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता यमुनानगर पोलिसांनी अपघाताची पुष्टी करत तपास केला आहे. त्यातून ही घटना समोर आली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये १० जण हे छत्तीगडमधील कोरबा जिल्ह्यातील भाविक होते. हे भाविक त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्यासाठी महाकुंभामध्ये जात होते. या अपघातामध्ये बसमधील १९ जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. 
 
या संबंधित भाविकांना रामनगर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, याआधी काही दिवसांपूर्वी महाकुंभमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. एका अफवेमुळे भाविकांची धांदल उडाल्याने काहीजण मृत्यू पावले होते. यानंतर आता योगी सरकारने  मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत केली होती. त्या घटनेनंतर आता अपघाताची घटना घडली आहे.
 
Powered By Sangraha 9.0