मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Brahman Sabha Thane) ब्राह्मण ज्ञातीची संस्था म्हणून ओळख असलेल्या ठाण्यातील ब्राह्मण सभेचा शतक महोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहाने गुरुवारी संपन्न झाला. सदर कार्यक्रम ब्राह्मण सभा, स्टेशन रोड, कौपिनेश्वर मंदिराशेजारी, ठाणे (पश्चिम) येथे पार पडला. दरम्यान सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ज्ञ दा.कृ.सोमण यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. त्यांच्या उपस्थितीत शतकमहोत्सवाच्या निमित्ताने ब्राह्मण सभेच्या नवीन लोगोचे अनावरणही करण्यात आले. शतकमहोत्सवी निमित्ताने संपूर्ण वर्षभर धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, इ चे सादरीकरण वर्षभरात निरनिराळ्या कार्यक्रमांद्वारे राबविण्यात येणार आहेत. शतक महोत्सवी सोहळ्यादरम्यान दिव्यांग कला केंद्र, ठाणे निर्मित व उद्यमी महाराष्ट्र प्रस्तुत 'अरेरे ते अरेव्वा' या किरण नाकती दिग्दर्शित एक कार्यक्रम सादर झाला. जगण्याची योग्य दिशा दाखवणारा विशेष मुलांचा हा विशेष कार्यक्रम पाहून उपस्थितांना यावेळी भारावून आले.