श्रीनगर : जम्मू-कश्मीरमध्ये विविध ठिकाणी शब-ए-बारात (Shab-e-Barat) गुरूवारी ३१ फेब्रुवारी साजरी करण्यात आली. अनेक मशिदींमध्ये लोक जमले होते. अनेक ठिकाणी नमाज अदा करण्यात आली. याचवेळी सलग सहाव्या वर्षी श्रीनगरच्या जामा मशिदीत शब-ए-बारातला कोणतेही वाईट कृत्य घडले नाही. संबंधित बारातला कोणतंही गालबोट लागले नाही. सुरक्षेच्या अनुश्रंगाने स्थानिक प्रशासनाने मशीद बंद ठेवण्यास सांगितल्याने ओमर अब्दुल्लांनी सोशल मीडियावर ट्विट केलं आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने शब-ए-बारातच्या नमाज पठणासाठी जामा मशीद बंद ठेवली. त्याच वेळी, रात्रीच्या नमाज पठणाने नेतृत्व करणारे ऑल पार्टीज हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवाइज उमर फारूख यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले.
समोर आलेल्या एका छायाचित्रामध्ये, मशिदीसमोर असलेल्या गर्दीला रोखत असताना पोलिसांचे एक वाहन दिसत आहे. या प्रकरणाची बातमी ऐकताच मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला खूप संतापल्याचे बोलले गेले.
त्यांनी या प्रकरणी एक ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले की, शब-ए-बारातदिवशी श्रीनगरमध्ये ऐतिहासिक जामिया मशीद कुलूपबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.सुरक्षा यंत्रणांनी हा निर्णय घेतला. हे दुर्दैवी असून हा निर्णय लोकांमध्ये विश्वासाप्रति असलेला अभावच. कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वासाचा अभाव निर्माण झाला, असे ट्विट ओमर अब्दुल्लने केलं.