मुंबई : इंडियाज गॉट लॅटेंट या यूट्यूब शोवरील रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, शोचे निर्माता आणि प्रसिद्ध कॉमेडियन समय रैना याला त्याचा मित्र मुनावर फारुकीने पाठिंबा दिला आहे.
मुनावरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत लिहिले, "समय कला म्हणजे झरासारखी असते, जितकी दाबाल तितकी ती वर उठते. माझा भाऊ प्रचंड ताकदीने परत येईल, बघाच." ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
समय रैना यांचे गुजरातमधील शो रद्द
दरम्यान, समय रैना यांनी गुजरातमधील आपले स्टँड-अप शो रद्द केल्याचे समोर आले आहे. बुधवारी विश्व हिंदू परिषद ने दावा केला की, समय रैनाचा गुजरातमधील नियोजित शो आता होणार नाही आणि तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मवरून त्याची तिकिटे काढून टाकण्यात आली आहेत.
वादाची सुरुवात कशी झाली?
समय रैना यांचा इंडियाज गॉट लॅटेंट हा शो गेल्या आठवड्यात मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला. रणवीर अल्लाहबादियाने या शोमध्ये आक्षेपार्ह विनोद केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.
रणवीर ने केलेली ही टिप्पणी अश्लील आणि आक्षेपार्ह असल्याचे म्हणत सोशल मीडियावर रणवीरवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्याचबरोबर समय रैना यालाही या वादाचा मोठा फटका बसला असून त्याच्या शोवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.