मुंबई : प्रसिद्ध पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया उर्फ बीअर बायसेप्स याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो भावनिक होताना दिसतोय, "मला खूप वाईट वाटतंय कारण सगळं काम थांबलं आहे. मला असं वाटतंय की मी दोषी आहे. पूर्ण टीमला मी असं एक्सपोज केलं. माझ्यामुळे सगळं काम थांबलं."
हा व्हिडिओ इंडियाज गॉट लॅटेंट या यूट्यूब शोवरील वादग्रस्त वक्तव्यांनंतर रणवीरच्या अडचणी वाढलेल्या असताना व्हायरल झाला. त्यामुळे अनेकजण हा व्हिडिओ त्याच्या अलीकडील कायदेशीर संकटाशी जोडत आहेत. मात्र, यामागचे खरे सत्य वेगळे आहे.
खरं तर, हा व्हिडिओ नवा नसून तीन वर्षांपूर्वीचा आहे. रणवीर याने कोविड-१९ पॉझिटिव्ह आल्यानंतर हा व्हिडिओ पोस्ट केला होता. तब्बल आठ मिनिटांच्या या व्हिडिओच्या सुरुवातीला तो स्वतःची कोविड चाचणी करताना दिसला आणि त्यानंतर त्याने ही विडियो बनवली त्यात त्याने, "हाय मित्रांनो, माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे." असे सांगितले.
म्हणजेच सध्या चर्चेत असलेला व्हिडिओ रणवीर अल्लाहबादियाच्या अलीकडील वादाशी संबंधित नाही. तो जुनाच व्हिडिओ आहे, जो चुकीच्या संदर्भात पसरवला जात असल्याच समोर आलय.