मुंबई : काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोलेंचा पत्ता कट करण्यात आला असून हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियूक्ती करण्यात आली आहे. गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी याबाबतची घोषणा करण्यात आली.
विधानसभा निवडणूकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर पक्षातील अनेकांकडून नाना पटोलेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे पराभवाची जबाबदारी स्विकारत नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अलीकडेच काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांचा राजीनामा स्विकारला.
हे वाचलंत का? - सुषमा स्वराज अभ्यासू, व्यासंगी आणि प्रभावी नेत्या
दरम्यान, आता बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील. यासोबतच आमदार विजय वडेट्टीवार यांची काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हर्षवर्धन सपकाळ हे शेतकरी कुटूंबातून आलेले असून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. तसेच सद्यस्थितीत ते राजीव गांधी पंचायत राज संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.