मिर्झापूरसह ५४ गावांची नावे बदलली; मुख्यमंत्री मोहन यादव यांची मोठी घोषणा
12-Feb-2025
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mohan Yadav Change Mirzapur Name) मध्य प्रदेशच्या मोहन यादव सरकारने तब्बल ५४ गावांची नावे बदलणार असल्याची मोठी घोषणा नुकतीच एका कार्यक्रमादरम्यान केली. अशी माहिती आहे की, देवास जिल्ह्यातील पिपलरावण गावात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष रायसिंग सैंधव यांनी त्यांना ज्या गावांची नावे बदलायची आहेत, त्यांची यादी दिली व त्यात ही मागणी जनतेने केल्याचे म्हटले आहे. तथापी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मंचावरच हा प्रस्ताव स्वीकारला आणि त्या गावांचे नाव बदलण्याची घोषणा केली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
ज्या गावांची नावे बदलली जाणार आहेत ती नावे पुढीलप्रमाणे :
* मुरादपूर - मुरलीपूर,
* हैदरपूरचे - हिरापूर,
* शमशाबादचे - श्यामपूर,
* इस्माईल खेडी - ईश्वरपूर
* अलीपूर - रामपूर
* नबीपूर - नयापुरा
* मिर्झापूर - मीरापूर
अशा एकूण ५४ गावांची नावे बदलण्यात आली आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात मोहन यादव यांनी शाजापूर जिल्ह्याच्या दौऱ्यात ११ गावांची नावे बदलली होती. उज्जैन दौऱ्यात त्यांनी तीन गावांची नावे बदलली होती.