सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कठोर कायदा करा!

11 Feb 2025 18:18:55
social media ott platforms law demands


ठाणे :       सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लिलतेचा कहर सुरु आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रोज नविन बेताल वक्तव्य केली जात आहेत. अशा घटनांमुळे भारतीय संस्कृती बदनाम होत आहे. सोशल मीडिया, ओटीटी प्लॅफॉर्मसाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्वे जारी केली असली तरी आता या माध्यमांना लगाम लावण्यासाठी कठोर कायदा करावा, अशी मागणी आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहरा दरम्यान केली. खा. म्हस्के यांच्या या मागणीला सर्वपक्षीय खासदारांनी पाठिंबा दर्शविला.

युट्यूबवरील एका कार्यक्रमात यूट्युबर रणवीर अलाहाबादिया याने आई आणि वडिलांसंदर्भात अतिशय अश्लाघ्य भाषेत संवाद साधला आहे. यामुळे खा. म्हस्के यांनी संसदेत संताप व्यक्त करत तात्काळ अलाहाबादियावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तसेच त्याच्यावर बंदी आणण्याची सूचना केली. भारतीयांनीही अलाहाबादियाला अनफॉलो करावे, असे आवाहन म्हस्के यांनी केले. सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉमवर सध्या अतिशय विचलित करणारे चित्रीकरण होत आहे.
 
अश्लील मजकूर सोशल मिडीया आणि ओटीटी प्लॅटफॉमवर सर्रास दाखवले जात आहेत. शिवराळ भाषा आणि चिथावणीखोर मजकूर, धार्मिक भावनांचा अनादर अशी उदाहरणे या मंचावर वाढत चालली आहेत. बदलत्या तंत्रज्ञानानुसार सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी सेन्सॉर आवश्यक असून कठोर कायदाही करायला हवा, असे मत खा. नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले.
 
 
सोशल मिडिया'वीरां' मुळे 'रण' माजेल!

सोशल मिडियात व्यक्त होताना आपल्या देशाची संस्कृती, इतिहास, परंपरा आणि जीवन पद्धती विसरून चालणार नाही. कोणत्याही पॉडकास्टरला त्याचे विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असले तरीही स्वत:च स्वत:ला घालून घ्याव्यात, अन्यथा लोकांच्या मोठ्या रोशाला त्याला सामोरे जावे लागू शकते. हे आता प्रत्येक सोशल मीडिया 'वीरा 'ने लक्षात घेतले पाहिजे अन्यथा`रण' माजू शकते, असा इशारा खा. म्हस्के यांनी दिला आहे.
 
 

 
 
Powered By Sangraha 9.0