मुंबई : यू ट्यूबर आणि पॉडकास्टार रणवीर अलाहाबादिया, जो ‘बियरबायसेप’ म्हणून ओळखला जातो, त्याने कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. पालकांच्या वैयक्तिक आयुष्यावर वादग्रस्त असा प्रश्न अलाहाबादियाने एका स्पर्धकाला चालू कार्यक्रमात विचारला. या एपिसोडमध्ये आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मुखिजा जी इंस्टाग्रामवर द रेबल किड म्हणून ओळखली जाते. यांच्यासारखे कंटेंट क्रिएटर्सही सहभागी होते.
'इंडियाज गॉट लेटेंट' या समय रैनाच्या शोमध्ये अतिशय अश्लील, अचरटपणा चालतो. तुमची वैचारिक घाण महाराष्ट्रात आणू नका. नुसता फालतूपणा असतो. शिव्या, वैयक्तिक आयुष्यावर केलेली अश्लील टीपण्णी, अरे ही कॉमेडी नाही. हा अचरटपणाचा कळस आहे. रणवीरने सुद्धा अतिशय चुकीचं विधान केलं. पण, याला कारणीभूत समय रैना आहे. माझा जाहीर निषेध…हॅशटॅग जोग बोलणार…” अशी पोस्ट शेअर करत पुष्करने समय रैनाबद्दल संताप व्यक्त केला आहे.
या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अलाहाबादियाने माफी मागितली आणि आपली चूक मान्य केली. तो म्हणाला "माझे जे काही बोललो ते चुकीच आहे, ते विधान विनोदीही नव्हते. विनोद माझे क्षेत्र नाही. मला दिलगिरी वाटते," असे त्याने सोशल मिडिया माध्यमाद्वारे सांगितले.