डेक्कन एज्युकेशनतर्फे रुबरु २५ आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे आयोजन

11 Feb 2025 19:57:26
ruba
मुंबई : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या दादर येथील नविनचंद्र मेहता इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट महाविद्यालयात ७ फेब्रुवारी रोजी  रुबरु २५  आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. "लक्ष्य" Aim It Achive It ही या वर्षीच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेची संकल्पना होती. उत्कृष्टतेचा पाठलाग, मर्यादा ओलांडण्याची जिद्द आणि विजयाचा निर्धार यांचा उत्साह लक्ष्य या संकल्पनेतून दिसून येतो.ह्या संकल्पनेवर आधारित तसा देखावाही उभारण्यात आला होता, ह्यात विद्यार्थ्यांनी भारतातील सर्व राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दाखवण्याचा प्रयत्न केला होता. तंत्रज्ञान, व्यवस्थापन, क्रीडा आणि संस्कृती क्षेत्रा वर आधारित निरनिराळ्या १७ स्पर्धामध्ये मुंबई च्या विविध महाविद्यालयानमधून ५९० हुन अधिक विद्यादर्थी सहभागी झाले होते. या स्पर्धांमध्ये क्रिकेट, तसेच शार्क टँक अशी लक्षवेधी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ज्यात विविध महाविद्यालयातील २६ विद्यार्थ्यांनी त्यांच्या उद्योजकांच्या कल्पना मांडल्या होत्या ज्यासाठी औद्योगिक क्षेत्रातल्या मान्यवरांना परिक्षक म्हणुन आमंत्रित केले होते.
 
रुबरू महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास, नेतृत्व विकसित करणे, आत्मविश्वास वाढवणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. हे कौशल्य गुण मुलांना त्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नोकरी तसेच स्वतःचा उद्योग सुरु करण्यात उपयोगी ठरतात असे मत नविनचंद्र मेहता इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि अँड डेव्हलोपमेंट संस्थेच्या प्रभारी संचालिका डॉ. रसिका मल्ल्या यांनी व्यक्त केले आहे. विभागप्रमुख डॉ. रेणुका सावंत आणि सांस्कृतिक समितीच्या प्रमुख डॉ. सुलक्षणा विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ह्या कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी हि सहभागी झाले होते.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0