शिवकुमार शर्मा यांच्या हत्येविरोधात सकल हिंदू समाजाचे धरणे आंदोलन

    10-Feb-2025
Total Views | 203

Shivkumar Sharma Shraddhanjali Sabha

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sakal Hindu Samaj Kharghar)
खारघरच्या उत्सव चौकात झालेल्या किरकोळ वादामुळे हिंदु युवक शिवकुमार शर्मा यांना आपला जीव गमवावा लागला. जिहादी प्रवृत्तीच्या दोन अज्ञात इसमांनी त्यांनी दि. २ फेब्रुवारी रोजी निर्घृणपणे हत्या केली. एक आठवडा उलटल्यानंतरही आरोपींना अटक न झाल्याने खारघर येथील हिंदू समाजाकडून याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला. विश्व हिंदू परिषद कोकण प्रांतच्या अंतर्गत रविवारी सायंकाळी ४ ते ८ दरम्यान खारघर पोलीस स्टेशन समोर स्व.शिवकुमार यांना श्रद्धांजली देत आरोपींना त्वरित अटक व्हावी यासाठी धारणे आंदोलन केले गेले.

ह्या आंदोलनात शेकडोंच्या संख्येने हिंदु बांधवांसह पीडित शिवकुमार शर्मा यांचे कुटुंबीय व काही स्थानीय नेते मंडळींनीही सहभाग घेतला होता. आंदोलनात प्रशासनासमोर काही मागण्या ठेवण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने आरोपींबरोबरच ५० हजारची संख्या जमणार असल्याचे सांगून १० ते १५ लाखाचा जमाव करून खारघरची नाकाबंदी केल्याबद्दल आयोजकांवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, याबाबत सांगितले आहे. समाजात दहशतवाद पसरवणाऱ्या इज्तेमा सारख्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात यावी व शिवकुमार यांच्या आरोपींना लवकरात अटक करून फास्ट ट्रॅक न्यायालयात हा खटला चालवून दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी याबाबतही मागण्या करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांच्या आत आरोपींना अटक न झाल्यास पुढे याहूनही मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सकल हिंदू समाजद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121