नवी दिल्ली (Budget 2025) : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला आणि त्यांचा आठवा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्लीत सादर करण्यात आला आहे. संबंधित अर्थसंकल्पातून गिग वर्कर्सनाही अधिकृत कामगार असा दर्जा देण्यात येणार असे सांगितले आहे. तसेच त्यांना ओळखपत्रही दिले जाणार असल्याची घोषणा निर्मला सितारामण यांनी केली आहे.
अर्थसंकल्पामध्ये शेती, शिक्षण, आरोग्य पर्यटन आणि उद्योग क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे सर्व जनसामान्यांनाही दिलासा देण्यात येईल असे सांगण्यात आले. यासोबत आता गिगवर्कर्स म्हणजेच स्विगी झोमॅटो आणि झेप्टोसारख्या कंपन्यांमध्ये डिलिव्हरी बॉईझ म्हणून काम करणाऱ्यांनाही अधिकृत कामगार म्हणून दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यांच्यासाठी सुरक्षा योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेमुळे गिग वर्कर्सना मोठा फायदा होईल असे सांगण्यात आले.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी योजनेंतर्गत त्यांना विमा ही देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. १ कोटी गिगवर्कर्सचे हात आता या सुरक्षा योजनेमुळे तुपात राहतील, असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही.
दरम्यान, गिग वर्कर्सना भविष्यामध्ये सुरक्षा नाही. कोणताही लाभ नसल्याने ही नोकरी असुरक्षित असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता गिग वर्कर्सना सुरक्षा योजनेच्या माध्यमातून अधिकृत कामगार म्हणून घोषणा केली आहे. तसेच त्यांना सरकारतर्फे अनेक मदतही दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.