अर्थसंकल्प २०२५ : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर
काय महाग आणि काय स्वस्त? सविस्तर माहिती वाचाच
01-Feb-2025
Total Views |
नवी दिल्ली (Budget 2025) : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला आणि त्यांचा आठवा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्लीत सादर करण्यात आला आहे. अर्थसंकल्पामध्ये शेती, शिक्षण, आरोग्य पर्यटन आणि उद्योग क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच सर्व जनसामान्यांनाही दिलासा देण्यात येईल असे सांगण्यात आले. संबंधित अर्थसंकल्पातून नेमक्या कोणत्या वस्तू महागल्या? काय स्वस्त झाले याची माहिती समोर आलेली आहे.
काय स्वस्त?
निर्मला सितारामण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये जनसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एलईडी, एलसीडी टीव्ही, चामड्यापासून बनवण्यात येणाऱ्या वस्तू, मोबाईल,इलेक्ट्रीक चारचाकी वाहन स्वस्त होणार अशी घोषणा करण्यात आली आहे. तसेच आरोग्यव्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला आहे. ज्यात ३६ जीवनावश्यक औषधांच्या करामध्ये सूट, कॅन्सरच्या ३६ औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्यात आली आहे.
काय महाग?
वस्तुंच्या किंमतीत घट होण्याबरोबरच वस्तुंच्या किंमतीत वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. नेमक्या कोणत्या वस्तु महागल्या आहेत याची माहिती जनसामान्यांना मिळणे आवश्यक असते. प्रामुख्याने घराच्या किंमतींमध्ये वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मोठे टीव्ही बऱ्याच आवश्यक वस्तूंवर सीमाशुल्क कमी सूट दिली जाणार आहे. विशेष म्हणजे तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात महादाई होणार असल्याचे संकेच अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देण्यात आले आहे.
तसेच व्यवसायाच्या स्टार्टअपसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्याने कर्जाची मर्यादा ही १० कोटींहून २० कोटींपर्यंत पोहोचली आहे. कॅन्सरग्रस्तांना सर्व जिल्ह्यात केअर सेंटरचा निर्णय घेण्यात आला. हा अर्थसंकल्प ऐतिहासिक ठरणार असा विश्वासही निर्मला सिताराण यांनी व्यक्त केला.