बीएसएफने बांगलादेश सीमा दलाला सीमेवर तळघर बांधण्यापासून रोखले

    01-Feb-2025
Total Views |

Bangladesh Border
 
कोलकाता : भारत-बांगलादेशच्या सीमेवर (Bangladesh Border) असलेल्या सीमा सुरक्षा दलाने शुक्रवारी ३१ जानेवारी २०२५ रोजी बांगलादेशला अवैध तळघर बांधण्यासाठी विरोध दर्शवला आहे. यावेळी सीमा रक्षक बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ३१ जानेवारी रोजी बीएसएफच्या जवानांनी या प्रकरणी हस्तक्षेप केला. त्याआधी उत्तर बंगालच्या सीमेवर दहग्राह अंगरपोटा भागामध्ये तळघर बांधले जात होते.
 
याप्रकरणी एका वृत्तानुसार, बीएसएफ जवानांनी स्थानिकांना तटरक्षकांनी १५० मीटर आत बांधकाम करण्यापासून रोखले. बांगलादेशच्या आक्षेपानंतर सीमा तटरक्षकाने भारत-बांगलादेश सीमेवरील असलेले तटरक्षण आणि संबंधित प्रकरणाची मोहिम यापूर्वीच थांबवली होती. दोन्ही देशांमधील निर्माण झालेली तणावजन्य परिस्थिती टाळण्यासाठी ते थांबवण्यात आले होते.
 
शेख हसीना यांना बांगलादेशातून हटवल्यानंतर नोबेल पुरस्काराने नावाजण्यात आलेले पुरस्कर्ते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून बांगलादेशी हिंदूंवरील अन्याय अत्याचारात वाढ झाली आहे. यामुळे बांगलादेश-भारताच्या सीमेवर तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
उल्लेखनीय म्हणजे, धर्मनिरपेक्ष शेख हसीनाला हटवल्यानंतर नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील इस्लामी सरकार सत्तेत आल्यापासून भारत-बांगलादेश सीमेवर तणाव वाढला आहे.