एआय विद्यापीठासाठी टास्कफोर्सची नियुक्ती! मंत्री आशिष शेलार यांची माहिती
01-Feb-2025
Total Views |
मुंबई : एआय विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी शनिवार, १ फेब्रुवारी रोजी दिली.
महाराष्ट्रात देशातील पहिले एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) विद्यापीठ स्थापन होत आहे. दरम्यान, यासाठी आता टास्कफोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. हे विद्यापीठ तयार करण्याबाबत नियोजन करण्याची जबाबदारी या टास्कफोर्सची असेल.
टास्कफोर्समध्ये कोणाचा समावेश?
माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही टास्कफोर्स समिती नेमण्यात आली आहे. या टास्कफोर्समध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, उद्योग, उर्जा आणि कामगार विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भारतीय तंत्रज्ञान संस्था(आयआयटी) पवई, मुंबईचे संचालक, भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) मुंबईचे संचालक, नेरकॉमचे प्रतिनिधी, एआयचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार येथील वरिष्ठ दर्जाचे अधिकारी राजीव गांधी विज्ञान आणइ तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संभाजीनगरचे कार्यकारी संचालक, ब्रम्हा रिसर्च फाउंडेशनमधील मुंबईचे प्रतिनिधी, प्रमुख एआय गुगल इंडियाचे प्रतिनिधी नरेन कचरु, एआय डीवीजन महिंद्रा ग्रुपचे सीइओ भुवन लोढा, ऍटलस स्किलटेक विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळूकर, क्यूएनयू लॅब्जचे सीईओ, डेटा सिक्युरीटी कौन्सिल ऑफ इंडियाचे सीईओ विनायक गोडसे, भारतीय नौदलाचे प्रतिनिधी, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे सीएमडी, एल अँड टीचे प्रतिनिधी आणि माहिती तंत्रज्ञान संचालनालय मुंबईचे कक्ष अधिकारी आदींचा या टास्क फोर्समध्ये समावेश असेल.