दिसपुर : आसामच्या श्री भूमी जिल्ह्यामध्ये भगवान हनुमंतांचे (Hanuman) प्राचीन मंदिर आढळले आहे. मंदिर आढळ्याने स्थानिक लोकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यासाठी आता ते मंदिर जनत करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पाथरकांडीतील बिरबारीमधील लंगाई नदीजवळ उत्खननादरम्यान हे मंदिर सापडले आहे. मंदिरामागे हनुमान चालीसा लिखीत स्वरूपात कोरलेली दिसत आहे.
मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी परिसरामध्ये भाविकांनी पुढाकार घेतला असून, अनिल सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती.
संबंधित हनुमंतांच्या मंदिरासाठी सागर सिन्हा यांनी भारतीय सैन्य दलामध्ये सेवा करत असताना अर्थिक मदत केली आहे. मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी दीड लाखांची मदत त्यांनी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिराची पुनर्बांधणी केल्यानंतर, भक्तांसाठी मंदिर एक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र बनेल अशी अपेक्षा आहे.
उत्खननात सापडलेले मंदिर हे हजारो वर्षे असून अज्ञातांनी काही कारणास्तव मातीत गाडले गेल्याचे बोलले जात आहे. असा स्थानिकांचा एक विश्वास आहे. घराच्या बांधकामासाठी उत्खनन करत असताना मंदिराची संपूर्ण रचना सापडली आहे. यामुळे खोदकामानंतर मंदिराचे काही भाग समोर आले आहेत.