मुंबई : (Municipal Elections) राज्यात सुरु असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पहिल्या टप्प्यात २ डिसेंबर रोजी २६४ नगर पंचायत आणि नगर परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून या निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तर काही दिवसांपूर्वीच निवडणुकींच्या दुसर्या टप्प्यात महानगर पालिकांच्या निवडणुका घेतल्या जाणार असल्याचं म्हटलं जात होत. आता या निवडणुकींची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Municipal Elections)
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकींच्या (Municipal Elections) तारीखा पुढील आठवड्यात सोमवार किंवा मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद देखील पुढच्याच आठवड्यात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Municipal Elections)
हेही वाचा : मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध
दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकांसह (Municipal Elections) पुणे, ठाणे आणि राज्यातील इतर महत्वाचे महानगर पालिकांच्या निवडणुका एकत्र होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यापूर्वी राज्य निवडणूक आयोग सर्व महानगर पालिकानिवडणुका तिसऱ्या टप्प्यात एकत्र घेणार असं सांगितले जात होते मात्र नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकी आरक्षणावरुन झालेल्या वादानंतर राज्य निवडणूक आयोग महापालिका निवडणुका दुसऱ्या आणि जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुका तिसऱ्या टप्प्यात घेण्याचा विचार करत असल्याची देखील माहिती समोर येत आहे. (Municipal Elections)