Iconic Multipurpose Indoor Live Entertainment Arena : नवी मुंबईत आंतराष्ट्रीय दर्जाचे मनोरंजन संकुल

09 Dec 2025 13:31:59
Iconic Multipurpose Indoor Live Entertainment Arena
 
नवी मुंबई : (Iconic Multipurpose Indoor Live Entertainment Arena) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवी मुंबईत अनेक जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून देशातील पहिला आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेना (Iconic Multipurpose Indoor Live Entertainment Arena) (मनोरंजन संकुल) नवी मुंबईमध्ये उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सिडकोतर्फे स्वारस्य अभिव्यक्ती जारी करून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.(Iconic Multipurpose Indoor Live Entertainment Arena)
 
न्यूयॉर्क येथील मॅडिसन स्व्केअर गार्डन आणि लंडन येथील ओटू अरेना या बहुउद्देशीय नाट्यगृहांपासून प्रेरणा घेऊन विकसित करण्यात येणारा हा प्रकल्प देशातील करमणूक पायाभूत सुविधांमध्ये नवीन मानदंड प्रस्थापित करणार आहे. रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीतसभा, आंतरराष्ट्रीय क्रीडाविषयक कार्यक्रम, भव्य स्तरावरील सांस्कृतिक महोत्सव आणि आभासी अनुभव यांच्या आयोजनाकरिता २०,००० प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था आणि २५,००० उभे प्रेक्षक इतकी क्षमता या ठिकाणी असणार आहे. यामुळे हा देशातील पहिला जागतिक दर्जाचा व भव्य क्षमता असणारा इनडोअर अरेना असणार आहे.(Iconic Multipurpose Indoor Live Entertainment Arena)
 
हेही वाचा : Goa nightclub fire: २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर काही तासांतच क्लबचे मालक फरार!
 
हा उपक्रम केवळ अरेना विकसित करण्यापुरता मर्यादित नसून सांस्कृतिक व आर्थिक चळवळीची ही सुरुवात आहे. या प्रकल्पाद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती,पर्यटनाला चालना,नवीन उद्योगांच्या संधींची निर्मिती होईल. तसेच, देशातील थेट करमणूक, जागतिक कार्यक्रम आणि आभासी अनुभव प्रदान करणारे अग्रणी शहर म्हणून नवी मुंबईचे देशामध्ये स्थान निर्माण होणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू असून कल्पनांना मूर्त रूप देण्याकरिता आता सिडकोने निविदा प्रक्रियांना गती दिली आहे.(Iconic Multipurpose Indoor Live Entertainment Arena)
 
“देशातील पहिला आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेना (Iconic Multipurpose Indoor Live Entertainment Arena) उभारणीसाठी सुरू करण्यात आलेली प्रक्रिया ही आगामी सांस्कृतिक आणि आर्थिक क्रांतीचा पाया आहे. या प्रकल्पाद्वारे जागतिक दर्जाची करमणूक भारतीयांकरिता खुली होऊन कलाकार, उद्योजक आणि स्थानिक समूहांकरिता व्यापक प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत व नवी मुंबईचे जागतिक नकाशावरील स्थान अधिक बळकट होणार आहे. प्रत्येक टप्प्यावर कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी असलेली सिडकोची कटिबद्धता अधोरेखित होत आहे.”(Iconic Multipurpose Indoor Live Entertainment Arena)
- विजय सिंघल ,उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
 
 
Powered By Sangraha 9.0