Humayun Kabir : एमआयएमसोबत 'युती'चे स्वप्न रंगवणाऱ्या हुमायूं कबीरला दणका

09 Dec 2025 16:24:04
Humayun Kabir
 
मुंबई : (Humayun Kabir) पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी करणारा तृणमूल काँग्रेसचा निलंबित आमदार हुमायूं कबीर (Humayun Kabir) यास चांगलाच धक्का बसल्याचे निदर्शनास आलेय. असदुद्दीन ओवेसींच्या एआयएमआयएम पक्षाने कबीर (Humayun Kabir) यास थेट आरसा दाखवला असून त्याच्यासोबत कोणतेही गठबंधन नसल्याचे पक्षाने जाहीर केले आहे. एआयएमआयएम पक्षाने याबाबत अधिकृत वक्तव्य जारी करत कबीर यांनी दिलेले प्रस्ताव ‘राजकीयदृष्ट्या संशयास्पद आणि वैचारिकदृष्ट्या विसंगत’ असल्याचे म्हटले आहे.(Humayun Kabir)
 
हेही वाचा : Rajesh Khawale : 'मी माझ्या पगारावर समाधानी आहे!' महसूल अपर आयुक्तांची नेमप्लेट, सोशल मीडियावर व्हायरल
 
दि. ६ डिसेंबर रोजी मुर्शिदाबादेत बाबरीची वीट रचल्यानंतर हुमायूं कबीरने (Humayun Kabir) नवीन पक्ष स्थापन करून एआयएमआयएम सोबत युती करण्याचे स्वप्न रंगवण्यास सुरुवात केली. उलट एआयएमआयएमनेच कबीर सोबत कोणतेही गठबंधन नसल्याचे जाहीर केले. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते असीम वकार यांनी म्हटले की, हुमायूं कबीर (Humayun Kabir) हे व्यापक प्रमाणात भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. अशा परिस्थितीत कबीर यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांचे प्रस्ताव आमच्या विचारसरणीशी मुळीच जुळत नाहीत.(Humayun Kabir)
 
 
Powered By Sangraha 9.0