मुंबई : (Devendra Fadnavis) सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू आहे, त्याचाच आज दुसरा दिवस. आज अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे माजी पीए आणि सत्ताधारी आमदार अभिमन्यू पवार यांनी अवैध दारुचा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र हा विषय मांडताना त्यांनी सरकारच्या महत्त्वकांशी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवर बोट ठेवलं. याआधी आमदार ज्योती गायकवाड यांनी देखील लाडक्या बहिणीचा उल्लेख केला होता. पण त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही योजना सुरूच राहिल असं थेट सांगितलंय.
हेही वाचा : Supreme Court : प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणे बलात्कार नाही म्हटल्याने SC नाराज; लैंगिक गुन्ह्यांसाठी देशव्यापी मार्गदर्शक तत्त्वे तयार होणार
आमदार अभिमन्यू पवार म्हणाले, "मी लक्षवेधी मांडली होती. आत्तापर्यंत दोन लक्षवेधी मांडली. ग्रामीण भागातील अनेक आमदारांचा विषय आहे. कुठंही गेलं तरी महिला भगिनी आम्हाला प्रश्न विचारतात. आपण लाडक्या बहिणी म्हणतो.. पण आपल्या बहिणीचं दु:ख आहे अवैध दारूवर आळा घातला नाही, याचं दु:ख आहे. अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा कारवाई झाली नाही तर याचा काय अर्थ? हा चिंतेचा विषय आहे." (Devendra Fadnavis)
मात्र यावर, (Devendra Fadnavis) मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट सांगितलं, "मी पुन्हा सदस्यांना सांगतोय की, पुन्हा लाडकी बहिण मधे आणू नका. लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका... नाहीतर घरी बसावं लागेल. लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील. ती योजना सुरूच राहिल. या योजनेला इतर योजनेसोबत तुलना करता येणार नाही. जर अध्यक्षांनी काही निर्देश दिले असतील आणि त्यावर कारवाई करण्यात आली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल."