Devendra Fadnavis : CSMT स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार : अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

09 Dec 2025 17:11:15
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात बोलताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. यापूर्वी राज्यमंत्र्यांनी लोकसभेत जुन्या आराखड्याच्या संदर्भात उत्तर दिले होते. मात्र, आता नवीन आराखडा तयार करण्यात आला असून, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचा देखील समावेश आहे.
 
हेही वाचा :  Humayun Kabir : एमआयएमसोबत 'युती'चे स्वप्न रंगवणाऱ्या हुमायूं कबीरला दणका
 
दरम्यान अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले, "नवीन आराखड्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर सीएसएमटी स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय भव्य असा पुतळा उभारला जाईल." (Devendra Fadnavis)
 
पुढे ते (Devendra Fadnavis) म्हणाले, "रेल्वे मंत्र्यांनी त्यांना याबाबत अवगत केले होते की, राज्यमंत्र्यांचे उत्तर जुन्या आराखड्यावर आधारित होते, तर नवीन आराखड्यात पुतळ्याचा समावेश आहे. यामुळे मुंबईच्या ऐतिहासिक सीएसएमटी स्थानकाचे महत्त्व आणखी वाढणार आहे." (Devendra Fadnavis)
 
 
Powered By Sangraha 9.0