CM Devendra Fadnavis : वंदे मातरम् हे गीत नसून भारताच्या स्वतंत्रतेचा मंत्र

08 Dec 2025 20:17:48
CM Devendra Fadnavis
 
 
नागपूर : (CM Devendra Fadnavis) वंदे मातरम् हे केवळ गीत नसून भारताच्या स्वतंत्रतेचा मंत्र असून वंदे मातरमवर झालेल्या आघातांसाठी काँग्रेस जबाबदार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, "वंदे मातरम् हे केवळ गीत नसून भारताच्या स्वतंत्रतेचा मंत्र आहे. हा राष्ट्रवादाचा मंत्र आहे. जे वंदे मातरम गीत गात गात भारताचे अनेक स्वातंत्रसेनानी आणि क्रांतिकारी फासावर चढले, तोच हा महामंत्र आहे. या महामंत्राने देशातील सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्याच्या आंदोलनाशी जोडले. या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यावर संसदेत चर्चा होणे अपरिहार्य आहे. ही चर्चा सुरू असल्याचा मला आनंद आहे. आज आमच्या विधानसभेतही संपूर्ण वंदे मातरम् गीत गात आमच्यातर्फे नमन केले. तसेच पुढे अधिवेशनात या गीतावर चर्चा होईल, असे आमच्या अध्यक्षांनी सांगितले आहे."(CM Devendra Fadnavis)
 
"वंदे मातरम् गीतावर कधीच बंदी आली नाही. वंदे मातरमवर झालेल्या आघातांना काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसनेच प्रस्ताव पारित करून वंदे मातरमला कात्री लावली. त्याच काँग्रेसच्या गळ्यात गळे घालून आदित्य ठाकरे रोज फिरतात. त्यामुळे त्यांनी भाजपला नव्हे तर काँग्रेसला प्रश्न विचारायला हवा. भाजपच्या कार्यकाळात वंदे मातरमचा केवळ सन्मानच झाला, कधीही त्यावर बंदी आली नाही," असेही ते म्हणाले.(CM Devendra Fadnavis)
 
 
हेही वाचा : Maharashtra Assembly : विधिमंडळाच्या दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली  
 
शिवसेना मजबूत होण्यासाठी त्यांच्या पाठीशी
 
"केवळ म्हणण्याकरिता आदित्य ठाकरेंचे २० आमदार भाजपच्या गळाला लागले असेही कुणी म्हणू शकते. पण कुणाच्या म्हणण्याने असे होत नाही. आम्हाला शिंदेसेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन काय करायचे आहे? ते आमचेच आहे. शिंदेसेना आमचा मित्रपक्ष आहे. ती खरी शिवसेना आहे. त्यामुळे आमच्या मित्रपक्षांचे आमदार आमच्याकडे घेऊन आम्हाला असे राजकारण करायचे नाही. याउलट शिवसेना मजबूत व्हावी यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. भविष्यात निश्चितपणे शिवसेना, भाजप आणि आमची महायुती अजून मजबूत होताना पाहायला मिळेल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.(CM Devendra Fadnavis)
 
आम्ही पूर्ण सोयाबीन खरेदी करायला तयार
 
"सोयाबीनचे दर स्थिर झाले आहेत असे मी कुठेतरी वाचले. त्यामुळे कपोलकल्पित बातमीकडे जाऊ नका. आम्ही पूर्ण सोयाबीन खरेदी करायला तयार आहोत. नाफेडने त्यासंदर्भातील सेंटर उघडले असून हमीभावाने खरेदी चालू आहे. काही ठिकाणी हमीभावापेक्षा जास्त भाव बाजार देतो आहे. त्यामुळे ते बाजारातही विकले जात आहे. त्यामुळे बाहेरून आले वगैरे या गोष्टींमध्ये अर्थ नाही," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0