Shivaji Underground in Bhimnagar Mohalla : छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास ‌‘अंडरग्राऊंड‌’; राज्यातील शिवप्रेमींमध्ये उसळली संतापाची लाट

08 Dec 2025 14:14:40
Shivaji Underground in Bhimnagar Mohalla

मुंबई : (Shivaji Underground in Bhimnagar Mohalla) अनुसूचित जातींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी स्थापन केलेल्या ‌‘बाट‌’ या राज्य शासनाच्या प्रतिष्ठित संस्थेने शुक्रवार, दि. 5 डिसेंबर रोजी दादर येथील शिवाजी नाट्यमंदिरात ‌‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला‌’ (Shivaji Underground in Bhimnagar Mohalla) या नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. या नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनैतिहासिक मांडणी करण्यात आल्याचा शिवप्रेमी संघटनांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. (Shivaji Underground in Bhimnagar Mohalla)
 
शिवप्रेमी संघटनांच्या मते, या नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची अनैतिहासिक आणि चुकीची मांडणी करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कोणताही विवादित आशय अधिकृत सरकारी संस्थेच्या मंचावर सादर होणे अयोग्य आहे. या नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू धर्माशी नाते आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेमागील विचारधारा चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. (Shivaji Underground in Bhimnagar Mohalla)
 
महाराजांनी आयुष्यभर हिंदू धर्म आणि रयतेचे मुघल राजवटीपासून संरक्षण व्हावे, यासाठी लढा दिला, हे ऐतिहासिक सत्य नाकारण्याचा प्रयत्न नाटकातून दिसतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही घटनासभेतील शेवटच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंच्या मुक्ततेसाठी संघर्ष केला, असे स्पष्टपणे म्हटले होते. मात्र, या नाटकातून महाराजांच्या विचारांचे चुकीचे अर्थ लावून हिंदवी स्वराज्याचे वैरी असलेल्यांना अनाठायी ‌‘क्लीनचीट‌’ देण्याचा प्रयत्न केला आहे, असे संघटनांनी म्हटले आहे. (Shivaji Underground in Bhimnagar Mohalla)
 
छत्रपती शिवरायांचे चरित्र चुकीच्या पद्धतीने मांडल्यास आंदोलन
 
‌‘बार्टी’ ही संस्था अनुसूचित जातींच्या युवकांच्या शिक्षण, नोकरी, कौशल्यविकास, संशोधन आणि कल्याणासाठी स्थापन केली आहे. अशा संवेदनशील हेतूसाठी असलेल्या निधीचा वापर समाजात विद्वेष पसरवणाऱ्या विशिष्ट विचारधारेचा प्रसार करणाऱ्या कार्यक्रमासाठी करण्यात आल्याची टीका या संघटनांकडून केली जात आहे. सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा वापर वादग्रस्त कार्यक्रमांसाठी होणे पूर्णतः अयोग्य आहे. या निर्णयामुळे छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास ‌‘अंडरग्राऊंड‌’ करण्याचा प्रयत्न केला, अशी भावना समाजात निर्माण झाली आहे. या संघटनांनी ‌‘बाट‌’कडून अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यामागील हेतू स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवरायांचे चरित्र चुकीच्या पद्धतीने मांडल्यास या विरोधात राज्यभर सत्य, न्यायासाठी आंदोलन करण्यात येईल, असेही म्हटले आहे.(Shivaji Underground in Bhimnagar Mohalla)
 
कोणकोणत्या शिवप्रेमी संघटनांनी केला विरोध?
 
आयोजनाचा शिवशंभो विचार मंच, अखंड भारत व्यासपीठ, छत्रपती शिवराय प्रतिष्ठान, स्वयम सामाजिक संस्था, विवेकानंद दर्शन प्रतिष्ठान, हिंदवी स्वराज्य ग्रुप, सद्भावना संघ, जागर या विविध संस्था आणि संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे.
 
हेही वाचा : Mangal Prabhat Lodha : जनआंदोलन उभारल्याशिवाय अवैध घुसखोरी थांबणार नाही  
 
नाटकामध्ये डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि मूळ इतिहासांशी प्रतारणा
 
शिवाजी मंदिर येथे ‌‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीम नगर मोहल्ला‌’ या नाटकाचा प्रयोग करण्यात आला. या नाटकाची संहिता वाचली आहे, त्याचे युट्यूबवरील व्हिडिओही पाहिले आहेत. त्यामध्ये नाटकामध्ये मूळ इतिहासाशी प्रतारणा केली आहे. आदर्श म्हणणारा राजा हरिश्चंद्र यांनी उभा केलेला बायका-मुली विकण्याचा बाजार अत्यंत घृणास्पद उल्लेख आहे. शिवाजी घडला, तो याकुबच्या प्रेरणेने अशा प्रकारचे अत्यंत चुकीचे वाक्य, 33 पैकी 11 अंगरक्षक मुस्लीम होते, असा धादांत खोटा इतिहास सांगणारे संवाद या नाटकामध्ये आहेत. संभाजी राजांच्या मृत्यूकडे जर पाहिले, तर त्यांच्या हत्येचे स्वरूप औरंगजेबाने नाही ठरवले, औरंगजेबाच्या चाकरीत असलेल्या ‌‘मनुवाद्यां‌’नी ठरवल्याचे सिद्ध होते, अशी औरंगजेबाची भलावण करणाऱ्या आणि शंभूराजांचा अपमान करणाऱ्या गोष्टी या नाटकातून मांडल्या गेल्या आहेत. नाटकाच्या लेखक-दिग्दर्शक मंडळींनी केवळ इतिहासाचाच नव्हे, तर डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचादेखील विपर्यास केलेला दिसतो. या मंडळींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‌‘थॉट्स ऑन पाकिस्तान‌’ पुस्तक जर कधी वाचले असते, तरीसुद्धा आपण किती चुकीचे लिहितोय, याची त्यांना कदाचित कल्पना आली असती. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्या नाटकाला ‌‘बाट‌’ ही संस्था अर्थसाहाय्य करते, हे अत्यंत मोठे आश्चर्य आहे. दि. 5 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या या नाटकामध्ये जर मुळ संहितेनुसार सर्व संवाद, विधान असतील, तर हे चुकीचे आहे. ‌‘शिवशंभू विचार मंच‌’ या खोट्या इतिहास लेखनाचा निषेध करत आहे. लेखक, दिग्दर्शकांनी हा खोटेपणा बंद करावा; अन्यथा संविधानिक मार्गाने या नाटकाचा विरोध करावा लागेल.(Shivaji Underground in Bhimnagar Mohalla)
- अभय जगताप, शिवशंभो विचारमंच, कोकण प्रांत संयोजक
 
महाराष्ट्र शासन आणि ‌‘बाट‌’ची भूमिका समन्वय, प्रक्रियात्मक पाठपुरावा ठेवण्याची राहील
 
नाट्यकला ही विचार मांडण्याचे एक प्रभावी माध्यम असल्याने प्रेक्षक आणि कलाकार यांच्यात संवादाची एक जागा निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त नावाने सादर झालेल्या किंवा अन्य महापुरुषांच्या नावाने सदर होणाऱ्या नाटकामध्ये कलाकार आपली मते, भूमिका नाट्यस्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करतात. त्या भूमिकेशी व्यक्तिशः ‌‘बाट‌’चे अधिकारी समर्थन करतील किंवा विरोध करतील, असे नाही. समाज म्हणून सर्व अभिव्यक्तींना कायद्याच्या चौकटीत पाहावे लागते. महापुरुषांच्या विचारांवर आधारित विविध कलाकृतींविषयी महाराष्ट्र शासन आणि ‌‘बाट‌’ यांची भूमिका नेहमीच समन्वय व प्रक्रियात्मक पाठपुरावा ठेवण्याची राहील.(Shivaji Underground in Bhimnagar Mohalla)
- सुनील वारे, महासंचालक बार्टी
 
‌‘बार्टी’ने इतिहासातील वास्तव नाकारले
 
‌‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला‌’ (Shivaji Underground in Bhimnagar Mohalla) या नाटकात त्याच्या मुळ संहितेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व यांची फारकत करण्याचा निंदनीय प्रयत्न केला आहे. ‌‘बार्टी’ने या नाटकाचे आयोजन करून इतिहासातील वास्तव नाकारले आहे. आम्ही याचा जाहीर निषेध करत आहोत.(Shivaji Underground in Bhimnagar Mohalla)
- अशोक राणे, इतिहास अभ्यासक
 
या अशा नाटकांचे प्रायोजन का केले?
 
‌‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला‌’(Shivaji Underground in Bhimnagar Mohalla) या नाटकाच्या मूळ संहितेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व यांची फारकत करण्याचा निंदनीय प्रयत्न केला आहे. ‌‘बार्टी’ने या नाटकाचे आयोजन करून इतिहासातील वास्तव नाकारले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मुळ संहितेनुसार नाटक प्रदर्शित झाले असेल, तर या अशा प्रकारचे नाटक समाजाला काय संदेश देणार होते? डॉ. बाबासाहेबांच्या साहित्यविचारांवर, चरित्रांवर किंवा समाजहित, जागृतीसाठीच्या कलाकृतींना प्रोत्साहन देण्याऐवजी ‌‘बार्टी’ने या अशा नाटकांचे प्रायोजन का केले? यामागचे कारण काय असावे?(Shivaji Underground in Bhimnagar Mohalla)
- प्रमोद काटे, सामाजिक कार्यकर्ते
 
 
Powered By Sangraha 9.0