Freedom Fighter Vinayak Damodar Savarkar : 'सागरा प्राण तळमळला’ या अजरामर काव्याच्या ११६ व्या वर्षपूर्तीनिमित्त १२ डिसेंबरला विशेष कार्यक्रम

08 Dec 2025 15:38:39
Freedom Fighter Vinayak Damodar Savarkar
 
मुंबई : (Freedom Fighter Vinayak Damodar Savarkar) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर(Freedom Fighter Vinayak Damodar Savarkar) यांनी कारावासात असताना रचलेल्या ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर काव्याला ११६ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक क्षणानिमित्त विजयापुरमच्या पोर्टब्लेअर येथे १२ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील व्हॅल्युएबल ग्रुपतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.(Freedom Fighter Vinayak Damodar Savarkar)
 
यावेळी सरसंघचालकांच्या हस्ते बियोदनाबाद येथे उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल. मुंबईतील उद्योजक आणि व्हॅल्युएबल ग्रुपचे संचालक अमेय हेटे यांच्या संकल्पनेतून हा पुतळा साकारण्यात आला आहे. या पुतळ्याचे बांधकाम महाराष्ट्रभूषण राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.(Freedom Fighter Vinayak Damodar Savarkar)
 
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे 'विकासपुरुष' म्हणजे देवेंद्र फडणवीस : ॲड राहुल नार्वेकर
 
या कार्यक्रमादरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेले महान काव्य 'ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला' या गीताचे विशेष सादरीकरण होणार आहे. तसेच 'जयोस्तुते' आणि 'हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा' अशी विशेष गाणी सादर होणार आहेत.(Freedom Fighter Vinayak Damodar Savarkar)
 
'व्हॅल्युएबल ग्रुप'चे संचालक अमेय हेटे म्हणाले की, हा सोहळा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही, तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरक इतिहासाला विनम्र अभिवादन आहे. पुढील पिढ्यांच्या मनामनात देशभक्तीची ठिणगी प्रज्वलित करण्याचा हा एक सशक्त प्रयत्न आहे.(Freedom Fighter Vinayak Damodar Savarkar)
 
 
Powered By Sangraha 9.0