Sanjay Shirsat : ठाकरेंचे २० पैकी १२ आमदार संपर्कात! शिंदेंच्या मंत्र्यांच्या खळबळजनक दावा!

08 Dec 2025 16:12:55
Sanjay Shirsat
 
मुंबई : (Sanjay Shirsat) सध्या महाराष्ट्रात विधानसभा हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अनेक नेते एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त आहेत. मात्र यातच आता शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. माध्यंमांशी बोलताना शिरसाट यांनी ठाकरेंचे २० पैकी १२ आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं सांगितलं आहे.
 
हेही वाचा :  Devendra Fadnavis : 'वंदे मातरम'वर कधीच बॅन लागला नव्हता, जे काही..., नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
 
माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सांगितले की, "ठाकरेंचे २० पैकी १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत, मी रोज त्यांच्या संपर्कात आहे, माझं रोज त्यांच्याशी बोलणं होतं. ज्या दिवशी एकनाथ शिंदे झेंडा दाखवतील, ते सगळे आमच्या शिवसेनेत दाखल होतील." (Sanjay Shirsat)
 
 
Powered By Sangraha 9.0