Dharavi : धारावी बचावकडे स्थानिक नेत्यांसह धारावीकरांचीही पाठ

08 Dec 2025 20:33:13
Dharavi
 
मुंबई : (Dharavi) रविवार, दि.७ रोजी धारावीत (Dharavi) धारावी बचाव आंदोलनाने सभेचे आयोजन केले होते. धारावी  (Dharavi) बचावमधील नेत्यांनी सभेपूर्वी या सभेला महाविकास आघाडीतील मोठे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली होती. आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर गायकवाड भगिनींनीही धारावी बचावपासून आता बचावाचीच भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा राज ठाकरे अशा सभेपूर्वी चर्चेत असणाऱ्या सर्वच दिग्गज नेत्यांनी पाठ फिरवल्याने दारोदारी जाऊन सभेला गर्दी जमविण्याची नामुष्की सभेच्या आयोजकांवर ओढवली. (Dharavi)
 
मात्र, राज्य सरकारकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळत असल्याने आता धारावीकरांमध्ये (Dharavi) नवचैतन्याचे वातावरण आहे. अशातच, या पुनर्विकास प्रकल्पासाठी सुरु असणाऱ्या सर्व्हेक्षणात लाखो धारावीकरांनी आपले सर्व्हेक्षण पूर्ण करून घेतल्याने विरोधकांचे सर्व छुपे अजेंडा अपयशी ठरत आहे. धारावीकरांचा राज्य सरकारच्या बाजूने वाढता कल लक्षात घेता रविवार,दि.७ डिसेंबर रोजी धारावी बचाव आंदोलन या गटाने कामराज शाळेजवळ सभेचे आयोजन केले होते. सभेपूर्वी मोठी प्रसिद्धी करूनही या सभेला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. स्थानिकांनीही या नकारात्मक राजकारण चालवणाऱ्या नेत्यांना पाठ दाखवली. (Dharavi)
 
गायकवाड भगिनींचा सावध पवित्रा
 
यापूर्वीही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींच्या तोंडावर गायकवाड भगिनींनी धारावी बचावच्या स्टेजवर न जाणेच पसंत केले आहे. धारावी ही 'मिनी इंडिया' म्हणूनही ओळखली जाते. इथे बहुभाषिक वर्षानुवर्षे वास्तव्यास आहेत. उबाठा गटाने भाषावाद करणाऱ्या मनसेचा हात पकडल्याने इतर भाषिक धारावीकरांनी आता उद्धव आणि आदित्य ठाकरेंकडे पाठ फिरविली आहे. अशातच काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी यापूर्वीच मनसेला महाविकास आघडीत घेण्यास स्पष्ट नकार असल्याचे सांगितले होते. अशावेळी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक यांच्या तोंडावर इतर भाषिक धारावीकरांचा रोष नको म्हणूनच गायकवाड भगिनींनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. धारावी बचावचे ज्येष्ठ नेते राजू कोर्डे यांची मुलगी सध्या मुंबई महानगरपालिकेच्या आखाड्यात धारावीतून उतरली असल्याचे चित्र आहे. तिच्याच प्रचारासाठी धारावी (Dharavi) बचावच्या सभेचा घाट घातल्याचा चर्चाही धारावीत आहेत.
 
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : वंदे मातरम् हे गीत नसून भारताच्या स्वतंत्रतेचा मंत्र  
 
विरोधकांचा विकास विरोधाचा अजेंडा
 
ही सभा फेल जाण्याचे दुसरे आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे विरोधकांचा विकास विरोधाचा अजेंडा आता धारावीकर (Dharavi) स्वतःच मोडून काढत आहेत. धारावी (Dharavi) बचावच्या सभेत मांडण्यात आलेल्या अनेक मागण्या या सरकारकडून यापूर्वीच वेळोवेळी जीआर काढून मार्गी लावण्यात आल्या आहेत. धारावी पुनर्विकासात एसआरए योजनेत पहिल्यांदाच पहिल्या मजल्यावरील झोपडीधारकांनाही घरे देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पुनर्विकासात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही धारावीकरांनी या प्रक्रियेवर आपला आक्षेप घेतलेला नाही. विशेष म्हणजे धारावीतील व्यावसायिक गाळ्यांबाबतचे धोरण देखील सरकारने जाहीर केले आहे. धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन आणि नियमित करण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. (Dharavi)
 
विकासासाठी एकही सकारात्मक कल्पना न मांडणे
 
धारावीतील झोपडीवासीय हे अत्यंत वेगाने विकसित होणारे मुंबई शहर आणि उपनगरे पाहत आहेत. अशावेळी अत्यंत दुर्गंधी, कचरा, घाण आणि अत्यंत दाटिवाटीत जीवन जगणारे धारावीकर पुढच्या पिढीला तरी चांगली जीवनशैली मिळावी यासाठी आग्रही आहे. काँग्रेस आणि आघाडी सरकारच्या काळात सत्ता भोगणाऱ्या गायकवाड घराण्याने धारावीच्या विकासासाठी नेमके काय केले? असा सवालही हेच धारावीकर आता उपस्थित करत आहेत. विशेष म्हणजे धारावीकरांना सरसकट मिठागरांवर टाकण्याचा डाव हा काँग्रेस आणि आघाडीच्या काळातच आखण्यात आला. याचा स्पष्ट जीआर देखील उपलब्ध आहे. मात्र आता धारावी पुनर्विकास वेग घेत असताना धारावीकरांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम विरोधक करत आहेत. (Dharavi)
 
नव्या पिढीला धारावीचा विकास हवा
 
धारावी (Dharavi) ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. अगदी जगभरातील लोकांना इथे फिरण्यासाठी आणले जाते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र, जुनी धारावी आणि आजची धारावी यात खूप फरक आहे. आजचे धारावी खूप व्यावसायिक आहे. आजची धारावीतील पिढी शिक्षण घेते आणि मोठ्या पदांवर देखील आहे. या नव्या पिढीला धारावीचा  (Dharavi) विकास हवा आहे. छोटी घरे, घाणींत जगणे हे नकोस झाले आहे.काँग्रेसच्या काळातही आमचे समर्थन होतेच तेव्हा त्यांनी आमचा पुनर्विकास का केला नाही? त्यांच्या चार पिढ्या इथून निवडून येत आहेत. म्हणूनच त्यांची इच्छा आहे की आम्ही या घाणीत असेच राहावे. आज जो पुनर्विकास होतो आहे, या प्रकल्पाला आमचा पाठिंबा आहे. पुनर्विकास प्रकल्प किंवा जीवनशैली बदलणारा नाही तर मानसिकदृष्ट्या ही आम्हाला सक्षम करणारा असेल. (Dharavi)
- गीता स्वामी, धारावीकर
 
मनसे-उबाठा युतीचा धारावी बचावला फटका
 
धारावी बचावला प्रत्युत्तर म्हणून आता धारावी (Dharavi) बनाव नावाने आम्ही प्रकल्प समर्थक एकवटले आहोत. आगामी महापालिका निवडणुकांसाठीच ही सभा ठेवण्यात आली होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्याने धारावीतील अनेक बहुभाषिक नाराज झाले आहेत. सभेला गर्दी नसल्याने आदित्य ठाकरेही या सभेला अनुपस्थित होते. लोकांना घरी जाऊन सभेचे आयोजक सभेसाठी लोकांना बोलावून आणत होते, मात्र तरीही सर्वांनी सभेला येण्यास नकार दर्शवला. (Dharavi)
 
 
Powered By Sangraha 9.0