मुंबई : (Sahyadri Tiger Reserve) 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'त (Sahyadri Tiger Reserve) 'विशेष व्याघ्र संरक्षण दला' स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव खितपत पडला असल्याचे वृत्त दै. 'मुंबई तरुण भारत'ने ५ डिसेंबर रोजी प्रकाशित केले होते. याची दखल घेत वन विभागाने राज्य सरकारकडे यासंदर्भात पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी वन विभागाच्या सचिवांना पत्र लिहून यांसदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे. गेल्या १० वर्षांमध्ये राज्य सरकारने यासंदर्भात पाठपुरावा न केल्याने सह्याद्रीतील 'विशेष व्याघ्र संरक्षण दला'चा प्रस्ताव खितपत पडला असून त्यामुळे स्थानिक तरुण रोजगारापासून वंचित राहिले आहेत.(Sahyadri Tiger Reserve)
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास रेड्डी यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, "मेळघाट व नागझिरा व्याघ्र प्रकल्पाकरिता राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडून ज्याप्रमाणे विशेष व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा अतिसंवेदनशील क्षेत्रात मोडत असल्याने वाघांच्या वाढत्या परिभ्रमणामुळे व वाढत असलेल्या अस्तित्वामुळे भविष्यात शक्यता नाकारता न येणाऱ्या अनुचित घटना उदा. अवैध शिकार, तस्कारी यांस प्रतिबंधा घालणेकरिता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात संरक्षण दल स्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील सद्याचे मानव-वन्यजीव संघर्षाच्या स्थितीचा विचार करता, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकरिता विशेष व्याघ्र संरक्षण दलाची स्थापना करण्यासाठी मंजूरी मिळण्याबाबत शासन स्तरावरुन विचार होण्यास विनंती आहे."(Sahyadri Tiger Reserve)
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : वंदे मातरम् हे गीत नसून भारताच्या स्वतंत्रतेचा मंत्र
'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात' (Sahyadri Tiger Reserve) साधारण १२० जणांच्या विशेष व्याघ्र संरक्षण दलाला राज्य शासनाकडून २०१३ साली मंजुरी मिळाली होती. मात्र, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने या प्रस्तावावर २०१५ मध्ये चर्चा केली. परंतु इतर प्रकल्पांमध्ये धोका जास्त असल्याचे दिसून आल्याने त्यावेळी सह्याद्रीबाबतचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा राज्य सरकारने यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव सादर केलेला नाही किंवा पाठपुरावा केलेला नाही. वन विभागाने यासंदर्भात २०१५ आणि त्यानंतर २०१७ साली पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला काहीही प्रतिसाद मिळाला नाही. प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी (Sahyadri Tiger Reserve) विशेष व्याघ्र संरक्षण दल लवकरात लवकर मंजूर व्हावे यासाठी तातडीने लक्ष घातल्याबद्दल सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास मोठा फायदा होणार आहे , त्याच बरोबर स्थानिक रोजगार निर्मिती होणार आहे, असे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सांगितले.(Sahyadri Tiger Reserve)