मुंबई : (Devendra Fadnavis) काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या कार्यकाळात 'वंदे मातरम्'वर बॅन लागले असल्याचे वक्तव्य केल होते. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले आहेत. अधिवेशना दरम्यान झालेल्या पत्रकार परिषेदत 'वंदे मातरम्'वर कधीच बॅन लागला नव्हता, असे मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले कि, "'वंदे मातरम्'वर कधीच बॅन लागला नव्हता. 'वंदे मातरम्'वर जो काही आघात झाला आहे, त्यासाठी पूर्णपणे काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसनेच प्रस्ताव जारी करत 'वंदे मातरम'चा अर्धा भाग काढून टाकला आणि त्यांनी मंजूर केलेला 'वंदे मातरम्'चा अर्धा भागच गायला जाईल असं सांगितल. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी हा प्रश्न काँग्रेसला विचारला पाहिजे, भाजपला नाही. भाजपच्या कार्यकाळात 'वंदे मातरम्'चा केवळ संवाद झालायं, त्यावर कोणत्याही प्रकारचा बॅन लावला गेलेला नाही." (Devendra Fadnavis)