मुंबई : (CM Devendra Fadnavis) " मुंबईच्या जीडीपीचा देशाच्या जीडीपीमध्ये १४ टक्के वाटा आहे. त्यामुळे मुंबईची आणि क्रमाने महाराष्ट्राची प्रगती राष्ट्राच्या उन्नतीसाठी महत्वाची आहे. राज्याच्या प्रगतीसाठी सरकार कटीबद्ध आहे आणि आपल्या या महाराष्ट्राचे खरे 'विकासपुरुष' म्हणजे देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)." असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. मुंबईच्या वल्ड ट्रेड सेंटर इथल्या चित्रप्रदर्शनाच्या उद्धाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरकारच्या वर्षपूर्तीवर भाष्य करताना ते म्हणाले की " राज्याचा विकास कायम ठेवणाऱ्या सरकारला १ वर्ष पूर्ण झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आपले राज्य प्रगतीची नव नवीन शिखरं गाठते आहे. मुंबईशहरामधील मेट्रोचं विस्तारलेलं जाळं असो किंवा महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरलेला समृद्धी महामार्ग, या प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्राची आर्थिक उन्नति होत आहे. जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे हे सरकार या पुढे देखील असेच कार्यरत राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो."(CM Devendra Fadnavis)
दि. ५ डिसेंबर रोजी मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे प्रख्यात चित्रकार भरत सिंह यांनी आदरणीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली २०१४ पासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या विकास यात्रेचा प्रेरणादायी प्रवास पोट्रेटच्या माध्यमातून साकारलेल्या प्रदर्शन सोहळ्याच्या उद्घाटन समारंभ पार पडला. या प्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, कौशल्य, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी आमदार राज पुरोहित, मुंबई भाजपचे महासचिव राजेश शिरवडकर, गणेश खणखर, आचार्य पवन त्रिपाठी, श्वेताताई परुळकर, माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर, माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर, माजी नगरसेविका रिता मकवाना, आदी मान्यवर उपस्थित होते. या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून मागील ११ वर्षाच्या महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख मांडण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रवीण नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात घडून आलेल्या परिवर्तनाचे चित्रण आपल्याला यामध्ये बघायाला मिळते. सदर चित्रप्रदर्शन दि.७ डिसेंबर पर्यंत सकाळी ११ ते संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत सगळ्यांसाठी खुले असून, या चित्रप्रदर्शनाला लोकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावावी असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.(CM Devendra Fadnavis)
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कार्यकर्त्यांसाठी धावून येणारे नेतृत्व म्हणजे देवाभाऊ!
" आज या प्रदर्शनामध्ये जी १०० चित्रांची मालिका आपण बघतो आहे, तिच्यातून राज्याच्या विकासाचा विचार प्रकट झालेला दिसून येतो. मागची २० ते २५ वर्ष मी देवेंद्रजींसोबत (CM Devendra Fadnavis) काम करतो आहे. विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा हा प्रवास सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. देवेंद्रजी प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या घरातला सदस्यासारखी वागणूक देतात. वेळी अवेळी कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारे नेतृत्व म्हणजे देवाभाऊ"(CM Devendra Fadnavis)
- श्री. मंगलप्रभात लोढा, कौशल्य, रोजगार व नाविन्यता मंत्री
दूरदर्शी नेतृत्वाचा वस्तूपाठ म्हणजे देवेंद्र फडणवीस!
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणून आकाराला आलं. येणाऱ्या काळामध्ये भारत ज्यावेळेला ५ ट्रीलीअन डोलरची इकॉनोमी म्हणून उदायाला येईल, त्यावेळेला त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा १ ट्रीलीन डॉलरचा असेल. महाराष्ट्रामध्ये आज जे महायुतीचे सरकार आहे ते शेवटच्या माणसाची सेवा करण्यासाठी कटीबद्ध आहे. देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये ही व्हीजन घेऊन लोकं काम करत आहेत. खरं म्हणजे दूरदर्शी नेतृत्वाचा वस्तूपाठ म्हणजे देवेंद्र फडणवीस."(CM Devendra Fadnavis)
- श्री. अमित साटम, मुंबई भाजप अध्यक्ष