मुंबई : (Aditya Thackeray Vs Bhaskar Jadhav) सध्या नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे गटात पक्षनेतेपदावरुन वाद सुरू असल्याच समोर येत आहे. आदित्य ठाकरे विरुद्ध भास्कर जाधव असा हा वाद असून, यंदा तरी भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार का? असा प्रश्न माध्यमांवरून उपस्थित केला जात आहे. (Aditya Thackeray Vs Bhaskar Jadhav)
दरम्यान, या संदर्भात माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, "मी विरोधी पक्षनेता व्हाव, असं आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाटत. त्यांनी मला तसं पत्र देखील दिलं. त्यानंतर आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अध्यक्षांनाही भेटलो यापैकी कोणाचाही या गोष्टीला विरोध नाही. त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तिच्या विरोधामुळे काही फरक पडेल असं मला वाटत नाही." (Aditya Thackeray Vs Bhaskar Jadhav)