मुंबई : (Mumbai BJP) मुंबई भाजपच्या वतीने शहरातील सर्व ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये नागरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून वरळी विधानसभा मतदारसंघातून त्याची सुरवात झाली. मुंबई भाजपचे (Mumbai BJP) अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी या मेळाव्याला संबोधित करून मार्गदर्शन केले.
यावेळी दै. मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार, वरळी भाजपचे संयोजक दीपक सावंत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या नागरी मेळाव्याची सुरुवात रविवारी वरळी विधानसभा मतदारसंघातील पहिल्या नागरिक भेटीने झाली. आगामी १५ दिवसांत उर्वरित सर्व मतदारसंघांमध्ये अशा भेटी आयोजित करण्यात येणार आहेत. (Mumbai BJP)
हेही वाचा : Goa nightclub fire : गोव्यातील एका नाईटक्लबला लागलेल्या भीषण आगीत कर्मचाऱ्यांसह २५ जणांचा मृत्यू!
विधानसभा मतदारसंघ पातळीवरील या नागरी मेळाव्यासाठी विविध क्षेत्रातील व्यावसायिक, डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, वकील, रहिवासी संघटना, नागरिक गट, एएलएमस, गृहनिर्माण सोसायट्यांचे तसेच एसआरए सोसायट्यांचे पदाधिकारी, चाळ कमिटीचे अध्यक्ष, तसेच बाजार, व्यापार आणि व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आणि प्रतिष्ठित नागरिकांनाही निमंत्रित केले जात आहे. (Mumbai BJP)
११ वर्षातील विकासकामांचा माहितीपट दाखवणार
प्रत्येक नागरी मेळाव्यात गेल्या ११ वर्षांत मुंबईत करण्यात आलेल्या अतुलनीय विकासकामांचा माहितीपट दाखवला जाईल. तसेच प्रत्येक कार्यक्रमात शहरातील एक वरिष्ठ भाजप नेता मुख्य वक्ते म्हणून उपस्थित राहतील, असे साटम यांनी सांगितले. तसेच गेल्या ११ वर्षांत मुंबईत झालेल्या उल्लेखनीय विकासकामांवर भर दिला जात आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिकेमध्ये भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याची आवश्यकता तसेच शहरात सुरू असलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे महत्त्वदेखील अधोरेखित केले जात आहे, असेही आ. अमीत साटम यांनी सांगितले. (Mumbai BJP)