मुंबई : (Raj Thackeray Meets Prime Minister Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र दिसल्याचे समोर येत आहे. पंतप्रधान मोदी व राज ठाकरे (Raj Thackeray Meets Prime Minister Modi) हे दिल्लीत एका खासगी कार्यक्रमात एकत्र दिसले. या भेटी दरम्यान त्या दोघांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल चर्चा झाली असल्याचा देखील अंदाज वर्तवला जात आहे.
हेही वाचा : Chunabhatti Sion Protest : आम्हाला रिक्षाने चैत्यभूमीवर जाऊ द्या! आंबेडकरी अनुयायांचे शीव-चुनाभट्टी मार्गावर आंदोलन
नेमकं काय घडलं?
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी व राज ठाकरे (Raj Thackeray Meets Prime Minister Modi) हे दिल्लीतील एका लग्न सोहळ्यात एकत्र दिसले. हा लग्नसोहळा अमित ठाकरे यांच्या मेव्हण्याचा होता. या कार्यक्रमात पंतप्रधान, राज ठाकरे आणि राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थिती होती. तेथेच राज ठाकरे व पंतप्रधानांची (Raj Thackeray Meets Prime Minister Modi) भेट झाली, त्यासोबतच काही काळ त्या दोघांमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा झाल्याच म्हटलं जात आहे.