CM Devendra Fadnavis : महावितरणचा सौर कृषीपंप योजनेत महाविश्वविक्रम, महाराष्ट्र आता थांबणार नाही असाच पुढे जात राहील !

06 Dec 2025 13:27:19
CM Devendra Fadnavis
 
मुंबई : (CM Devendra Fadnavis) पुढील वर्षी १० लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल. शेतकऱ्यांसाठी वेगळी सौर ऊर्जा तयार होत असून, एकूण १६ हजार मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पांपैकी ३ हजार मेगावॅटचे प्रकल्प साकार झाले आहे. सौर ऊर्जेसाठी १० हजार कोटींचे कर्ज मंजूर झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
 
महाराष्ट्रामध्ये एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषीपंप बसवण्याच्या उच्चांकाचा जागतिक विक्रम झाला असून, त्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. त्यानिमित्त प्रमाणपत्र देण्याच्या सन्मान सोहळा शुक्रवार,दि.५ रोजी शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील ऑरिक सिटी कार्यालयाच्या आवारात पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस  (CM Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमास गिनीज बुकचे परीक्षक कार्ल्स सॅबील याची उपस्थिती होती.
 
मुख्यमंत्री फडणवीस  (CM Devendra Fadnavis) यांनी आपल्या भाषणात सुरुवातीला शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील जनतेचे आभार व्यक्त केले. हे जनतेला समर्पित वर्ष होते. सगळ्यांच्या जीवनात मूलभूत परिवर्तनसाठी योजना आणल्या त्या कार्यान्वित केल्या. महाराष्ट्र थांबणार नाही, असाच पुढे जात राहील, हा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, सौर ऊर्जेचा वापर वाढल्यामुळे सौर ऊर्जा उपकरण निर्मिती कंपन्या, वेंडर्स, कामगार, देखभाल करणारे अशा १ लाख लोकांना रोजगार मिळाला. त्यामुळे ऊर्जाक्षेत्राला नवी दिशा देणारी ही योजना आहे,असेही मुख्यमंत्री फडणवीस  (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
 
हेही वाचा : IndiGo Airlines : इंडिगोच्या सेवा व्यत्ययाची उच्चस्तरीय चौकशी होणार  
 
या सोहळ्यास राज्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, विधान परिषद सदस्य आ. संजय केणेकर, आ. अनुराधा चव्हाण, आ.नारायण कुचे,आ.प्रशांत बंब,आ.सुरेश धस, मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार तथा मित्राचे संचालक प्रवीण परदेशी, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जिवने, सहसचिव (ऊर्जा) नारायण कराड, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक तसेच ऊर्जा विभागाचे अधिकारी आणि अभिनेते संदीप पाठक, योगेश शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. (CM Devendra Fadnavis)
 
पंच कार्ल सॅविले यांनी केली विक्रमाची घोषणा
 
सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या (CM Devendra Fadnavis) हस्ते राज्यातील सौरकृषी पंपाचे डिजिटल लोकार्पण करुन त्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीने संवाद साधला. त्यानंतर गिनीज बुकचे निरीक्षक पंच कार्ल सॅविले यांनी विक्रमाची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी प्रमाणपत्र व मेडल मान्यवरांना प्रदान केले. सौर कृषी पंप योजनेसाठी अर्थसहाय्य करणाऱ्या एआयआयबी बॅंकेसोबतच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. बॅंकेचे प्रत्युष मिश्रा व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. (CM Devendra Fadnavis)
  
उत्तर महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करणार!
 
मराठवाड्याचे कौतुक करताना फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, या योजनेच्या अंमलबजावणीत मराठवाड्याने आघाडी घेतली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४ हजार पंप लावण्यात आले. शेतकऱ्यांना नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेमार्फत अन्य लाभ, बाजाराची उपलब्धता देऊन शेती शाश्वत कशी होईल, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. नदी जोड सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून वाहून जाणारे पूराचे पाणी मराठवाड्यात, विदर्भात व उत्तर महाराष्ट्रात नेऊन दुष्काळ मुक्ती करायची आहे. (CM Devendra Fadnavis)
 
 
Powered By Sangraha 9.0